अंडी आणि कथा.

 तुम्ही "अंडी कशी दिली?" नावाची शॉर्ट यू-ट्यूब आहे. भाई कदम यांची कॉमेडी आहे. बघाच एकदा. एकदम हिलारिअस आहे.

त्याच चालीवर ही माझी  कॉमेडी.

एक तरुणी मराठी संस्थळावर येते.

"कथा आहेत काय?"

"आहेत ना. ही घ्या. सगळ्यात जास्त प्रतिसाद आणि वाचने झालेली." 

"ऑव. ही नको. अश्लील आहे."

"बर मग ही घ्या. एकदम इंटेलेक्च्युअल आहे."

"इंटेलेक्च्युअल नको. समजायला अवघड जातेय."

"ही बघ तुझ्यासाठी खास. आवडेल तुला."

"हॉव, ही चालेल."

zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz


आणि हा अजून एक. 

गिऱ्हाईक आणि भाजीवाली यांचा संवाद.

"कोथिंबीर  कशी आहे."
"हिरवी." 
"अहो, म्हणजे कशी दिलो."
"हाताने."
"अहो बाई, काय भावाने दिली."
"भावाने नाही मीच दिली! 


Comments

Popular Posts