एपिलेप्सी

 मित्रो

तुम्ही कधी कुणा माणसाला फीट- फेफरे - (एपिलेप्सी) येताना पाहिले आहे? अंगावर काटा आणणारा प्रसंग असतो तो. तुमची भीतीने घाबरगुंडी उडेल. काय करावे ते सुचणार नाही.
मी आयुष्यात पहिल्यांदा एका बस स्टॉप वर बसची वाट पाहत असताना एकाला फिट आलेली पाहिले. त्याने डोळे फिरवले. बुभूळे पांढरी फटक झाली. बापरे मला वाटले हा गेला, ह्याचा खेळ खल्लास झाला. पण आजूबाजूला अनुभवी लोक होते. त्यातल्या एकाने आपली चप्पल काढली आणि त्या माणसाच्या नाकाला लावली. हळूहळू तो फेफरे आलेला माणूस शुद्धीवर आला.
What nonsense! नंतर माझ्या लक्षात आले कि हे अगदी सर्व सामान्य नॉलेज आहे? त्यातही गंमत अशी आहे कि हा उपाय पूर्व युरोपातही प्रचलित आहे.
प्रश्न असा आहे कि ह्या उपायाला काही शास्त्रिय आधार आहे?
हो आहे. सगळ्यात घाणेरडी वास मारणारी आणि हातासरशी असणारी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा बूट. कुठून कुठून घाणीतून फिरून येतात कोण जाणे. (असेही म्हणतात कि फक्त चपलेचाच वास - दुसऱ्या वासाचा काही फायदा नाही.)
तुम्हाला काय वाटते?

माफ करा. इंग्लिशमध्ये लिहित आहे इलाज नाहीये.
Research published in the June 2008 issue of Clinical Neurology and Neurosurgery suggests that a strong smell administered just as a seizure starts functions like a slap to the face or the shock of defibrillation paddles to reset “truth” in the olfactory cortex, thereby stopping seizure in the temporal lobe.

Comments

Popular Posts